महाराष्ट्र

खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले

मुंबईत येऊन अमित शहांनी ठणकावून सांगितले मुंबई : खरी शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असतात. अशातच आता यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उडी घेतली आहे. खरी शिवसेना कोणाची याचा परिचय एकनाथ शिंदे यांनीच करुन दिल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करुन दिला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हादेखील डबल इंजिन सरकार होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, परत डबल इंजिन सरकार आल्याचे अमित शाह म्हणाले. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डबल इंजिन सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात सात लाख कोटीहून अधिक गुंतवणूक करुन मुंबईला वाचवण्याचे काम केल्याचे अमित शाह म्हणाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नवनिर्मित मुख्यालयाच्या इमारतीचे आणि मुंबईत राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक परिषदेचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अनेक वर्षापासून महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचं नेतृत्व करत असल्याचे अमित शाह म्हणाले. देशातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची देशातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. एफडीआयमध्ये सगळ्यात जास्त हिस्सा महाराष्ट्रात आहे. सगळ्यात जास्त विदेशी पर्यटक महाराष्ट्रात, सगळ्यात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात असल्याचे अमित शाह म्हणाले. भारताचे सगळ्यात मोठे बंदर वाढवणमध्ये तयार होत आहे. येणाऱ्या काळात मुंबईचे काय होणार याची मला चिंता होती. कारण वाढती लोकसंख्या असेल, वाढती झोपडपट्टी, ट्रॅफिकची समस्या होती. पण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करेल असे अमित शाह म्हणाले. त्यांनी पहिल्या सरकारच्या कार्यकाळात मुंबईच्या विकासासाठी सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे अमित शाह म्हणाले. यावेळी बोलताना अमित शाह यांनी काँग्रेसवर देखील टीका केली. किती वर्षे झाली तुमच्याकडे महाराष्ट्र होता. तुम्ही काय केले? मुंबईसाठी तुम्ही काय केले? असा सवाल अमित शाह यांनी केला. देशात विमानतळांची संख्या वाढली आहे. रेल्वे वाढल्या आहेत. मेट्रो झाली आहे असे अमित शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मोठं काम झाल्याचे अमित शाह म्हणाले. औद्योगिक विकासासाठी निधी दिला, त्याचबरोबर जलसिंचनासाठी अनुदान दिल्याचे अमित शाह म्हणाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600