जिल्हा

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

ठाणे : पालघर जिल्ह्यातील वसई विभागातील महावितरणचे कनिष्ठ अभियंता राजेश गुप्ता यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदार हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून त्यांनी दोन दुकानांचे इलेक्ट्रिक मीटर लावण्याचे काम घेतलेले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी दोन्ही दुकानांची कागदपत्रे बनवली होती आणि तक्रारदार यांनी एमएसईबी कार्यालय कोल्हे विभाग वसई येथे जमा केले होते. त्यानंतर लोकसेवक श्री. गुप्ता यांनी दोन्ही दुकानांची मीटर्स देण्यासाठी एकूण दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर 15 जानेवारी 24 रोजी लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना लोकसेवक गुप्ता यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600