जिल्हा

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांची तपासणी

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांची तपासणी
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांची तपासणी फोटो: ठाणे वैभव
कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार वाडा: वाडा तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्ण तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी यांना मोबाईल टॉर्चचा आधार घ्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दररोज शेकडो रुग्णांची तपासणी केली जाणाऱ्या या केंद्रात सोमवार( दि.22) संध्याकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. अशावेळी महिला डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्‍यांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातच रुग्ण तपासणी सुरू ठेवली. या प्रसंगात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक होत असले तरीही अशा आरोग्य केंद्रांमध्ये आपत्कालीन सुविधा नसल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. सदर अशी घटना या प्राथमिक आरोग्य केंद्र वारंवार घडत असते. या घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत की, शासन आरोग्य क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असतानाही, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत? अशा वेळेस पर्यायी वीजपुरवठ्याची सोय नसेल तर रुग्णसेवा कशी सुरळीत पार पडणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600