जिल्हा

बुलेट ट्रेनसाठी १० मजली इमारतीएवढे खोदकाम

बुलेट ट्रेनसाठी १० मजली इमारतीएवढे खोदकाम
बुलेट ट्रेनसाठी १० मजली इमारतीएवढे खोदकाम फोटो: ठाणे वैभव
मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील भूमिगत स्थानकाचे बांधकाम वेगाने सुरू असून भुयारीकरणाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील हे एकमेव भूमिगत स्थानक आहे. सध्या इतर पायाभूत कामेही जलद गतीने सुरू आहेत. या स्थानकासाठी सुमारे ३२.५ मीटर खोलीपर्यंत खोदकाम करण्यात येत आहे. ही खोली जवळपास १० मजली इमारतीच्या उंची इतकी आहे. फलाट सुमारे २६ मीटर खोलीवर बांधला जाणार आहे. स्थानकात कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असतील. एकूण ६ फलाट प्रस्तावित असून प्रत्येकाची लांबी सुमारे ४१५ मीटर असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानकाला मेट्रो आणि रस्ते मार्गाने जोडण्यात येणार आहे. दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे तयार केली जात असून त्यापैकी एक मेट्रो लाईन २ बी शी जोडले जाणार आहे. तर दुसरे एमटीएनएल इमारतीच्या दिशेने असेल. स्थानकात नैसर्गिक प्रकाशासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी सुमारे १८.७ लाख घन मीटर माती उपसण्यात आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बांधकामस्थळी ताशी १२० घन मीटर क्षमतेचे तीन बॅचिंग प्लांट कार्यरत आहेत. काँक्रीटचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आईस आणि चिलर प्लांटचा वापर केला जात आहे. पायाचे काम एम-६० ग्रेड काँक्रीटने, तर कॉलमचे काम एम-८० ग्रेड काँक्रीटने केले जात आहे. स्थानकाच्या पायासाठी सुमारे दोन लाख घन मीटर काँक्रीट लागणार असून आतापर्यंत एक लाख घन मीटरपेक्षा अधिक काँक्रीट टाकण्यात आले आहे. याशिवाय, सेकंड पाइलिंग (३,३८८), कॅपिंग बीम (२,२०३ आरएमटी) आणि फ्लड वॉल (२,०७८ आरएमटी) यांची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. बांधकामस्थळी आधुनिक काँक्रीट लॅबही उभारण्यात आली आहे. सर्व तांत्रिक चाचण्या स्थानिक पातळीवरच केल्या जात आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि आधुनिक होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असल्याचे मानले जात आहे, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने देण्यात आली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार अशी एकूण १२ स्थानके आहेत. त्यात वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती ही स्थानके आहेत. प्रत्येक स्थानकाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600