जिल्हा

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वीय सहायकाच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट

ठाणे: शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि खाजगी स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या नावे अज्ञात अनोळखी व्यक्तीने बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. ते अकाउंट माझे नाही. कृपया त्या अकाउंटला कोणताही रिप्लाय देऊ नका. कोणतीही माहिती शेअर करु नका, तसेच पैशाची मागणी केल्यास देऊ नका. शक्य असल्यास ते अकाउंट रिपोर्ट करा, असे आवाहन प्रभाकर काळे यांनी केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महत्वाचे नेते अधिकारी यांचे सोशल मीडियावर फेक अकाउंटद्वारे चॅट तसेच फोनच्या माध्यमातून मित्र, नातेवाईक व इतर नागरिक यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशाच प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात विश्वासू आणि निष्ठावंत असलेले खाजगी स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे पोलिस आयुक्त सायबर सेल याबाबत कारवाई करतील याची लवकरच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600