जिल्हा

मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोरांना अटक

भाईंदर : महापालिकेच्या विकासकामावर व्हिडिओ बनवत असताना काही जणांनी हस्तक्षेप करून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना मीरारोड परिसरात घडली आहे. यामध्ये एकाने मोठ्या चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात महापालिकेची जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. मागील काही दिवसांपासून हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे त्याचा व्हिडिओ करण्यासाठी मनसे पदाधिकारी रेश्मा तपासे या घटनास्थळी आल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे सहकारीही होते. पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यासाठी त्या व्हिडिओ बनवत होत्या. दरम्यान, व्हिडिओ सुरू असताना त्यांच्या मागे एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत धूम्रपान करत उभी राहिली. याबाबत मनसे पदाधिकारी स्वप्नील तपासे यांनी त्याला जाब विचारला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने दगडाने तपासे यांच्या डोक्यावर हल्ला केला. ही घटना पाहून जवळ उभे असलेले आरोपीचे सहकारीही पुढे आले आणि त्यांनी लोखंडी रॉड व इतर साहित्याने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600