जिल्हा

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर
वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर फोटो: ठाणे वैभव
वसई : वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेने सादर केलेल्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी पालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. यात २९ प्रभाग असणार आहेत. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. वसई विरार महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता. मुदतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत महापालिकेकडे १६० हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या होत्या. विशेषतः यात २९ गावांतील दोन हजाराहून अधिक नागरिकांच्या सामूहिक हरकतींचा ही समावेश होता. प्राप्त हरकती व सूचनांवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या सभागृहात सुनावणी पार पडली होती. यावेळी १६० हरकतदारांपैकी १५४ हरकतदार उपस्थित होते. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी ३ ऑक्टोबर रोजी वसई-विरार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिकेने सादर केलेल्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिल्याचे पत्र नगरविकास विभागाला दिले आहे. त्यानुसार पालिकेने सोमवारी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात साधारणपणे ३८ ते ४७ हजार इतकी लोकसंख्या असणार आहे. यात २८ प्रभाग हे ४ सदस्यांचे तर एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असणार आहे. २९ प्रभागात ११५ नगरसेवकांसाठी वसई-विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. २९ गावे पालिकेतच वसई तालुक्यातील २९ गावे महापालिका क्षेत्रातून वगळण्याची मागणी संबंधित गावांमधील दोन हजारांहून अधिक नागरिकांनी केली होती. या मागणी पत्रासोबतच पालिकेने २९ गावे पालिका क्षेत्रात सामाविष्ट करून तयार केलेल्या प्रभाग रचनेवर सुद्धा याच नागरिकांकडून हरकत नोंदविण्यात आली होती. या संदर्भात सुद्धा सुनावणी घेण्यात असून निवडणूक आयोगाने सदर हरकती फेटाळल्या आहेत. परिणामी अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि नागरी भाग अशा वादात अडकलेल्या २९ गावांचा समावेश अखेर वसई-विरार पालिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600