जिल्हा

ठाण्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएनवनचा नवीन व्हेरीएंटचा रुग्ण दाखल झाला आहे. हा रुग्ण 19 वर्षीय तरुणी असून तिला मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. नवीन व्हेरिएंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळल्याने ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जेएन वन हा ओ मायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला आहे. तीनशेहून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरिएंटचे 13 रुग्ण असून राज्यात हा आकडा 24 वर गेला आहे. ठाण्यातही या वेरिएंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या वृत्ताला कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र भारूड यांनीही दुजोरा दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600