जिल्हा
झाड पडून पाच घरांचे नुकसान; दोघे जण जखमी
ठाणे : झाड पडून पाच घरांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारी कळवा परिसरात घडली आहे. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून जखमींना उपचारांसाठी पालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कळव्यातील गोपाळराव नगर या ठिकाणी फास्ट आणि स्लो रेल्वे लाईनच्या बाजूला हिरा पाटील चाळीमधील पाच घरांवर हे झाड पडले. त्यानंतर घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान १ - रेस्क्यू वाहनासह पोचले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसून दोन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांना उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुर्वेश भोईर (२०) तर मंजुषा केवड (२६) अशी जखमींची नावे असून दुर्वेशला हाताला, पायाला तसेच पोटाला किरकोळ दुखापत झाली असून मंजुषा केवड यांना डोक्याला, डाव्या पायाला व हाताला दुखापत झाली झाली आहे. नुकसान झालेल्या घरांमध्ये सिता धांडगले, रंजना शेळके, अंजली पेडणेकर, हर्षदा केवड, राधादेवी केवड.या सर्वांच्या घराच्या छताचे नुकसान झाले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600