जिल्हा

ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या तंबूत?

ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या तंबूत?
ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या तंबूत? फोटो: ठाणे वैभव
११ पैकी सात नगरसेवकांच्या उपस्थितीत केली गटाची नोदंणी कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ नगरसेवक विजयी झाले. परंतु कोकण विभागीय आयुक्तांकडे गटाच्या नोंदणीसाठी फक्त सात नगरसेवक उपस्थित राहिले. त्यामुळे उर्वरित चार नगरसेवक शिंदे गटाच्या तंबूत दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला ५३ जागा मिळाल्या असून भाजपला ५० जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी ६२ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे शिंदे गटाला नऊ तर भाजपला १२ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष इतर पक्षातील नगरसेवक मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाकडे यापूर्वीच ठाकरे गटाच्या दोन नगरसेवकांनी संपर्क साधला आहे. तर आज कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करण्यासाठी ठाकरे गटाचे ११पैकी सात नगरसेवक गेल्याने उर्वरित चार नगरसेवकांनी शिंदे गटाचा रस्ता धरला की काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. कल्याण शिवसेना शहरप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळा परब यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त कार्यालय येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ११ नगरसेवकांपैकी चार नगरसेवक उपस्थित नव्हते. उपस्थित सात जणांमधील उमेश बोरगावकर यांची गटनेतापदी नियुक्ती करण्यात आली असून पक्षाच्या प्रतोदपदी संकेश भोईर यांची निवड करण्यात आली आहे. गैरहजर नगरसेवक मधुर म्हात्रे, किर्ती ढोणे, राहूल कोट, स्वप्नाली केणे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगत, परब राहत असलेल्या प्रभागातील चार उमेदवार उबाठा शिवसेनेचे निवडून आले असून लगतच्या प्रभागातून उबाठाचा एक उमेदवार असे एकूण पाच नगरसेवक निवडून आणले असल्याचे परब यांनी सांगितले. या राजकीय घडामोडी पाहता २२ तारखेला जाहीर होणाऱ्या महापौर आरक्षण सोडतीनंतर वेगवान घडामोडी होतील आणि कोणता पक्ष महापौर पदाचा दावेदार ठरेल याचे चित्र स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600