जिल्हा

दोन महिला रिक्षाचालकांची ‘फ्री स्टाईल’

ठाणे : कापूरबावडी रिक्षा स्टँड परिसरात बुधवारी काही कारणांवरून दोन महिला रिक्षा चालकांमध्ये ‘तू तू मैं मै’ सुरु झाल्यानंतर पुढे भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दोन रिक्षाचालक महिलांची हाणामारी होत असल्याचा एक व्हिडिओ ‘सोशल मीडियावर’ प्रसारित झाला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे. सीसी कॅमे-याप्रमाणे सोशल मीडियाचा ‘तिसरा डोळा’ समाजात घडणा-या चांगल्या आणि वाईट गोष्टीदेखील जगासमोर दाखवून, दोन महिला रिक्षा चालकांच्या हाणामारीचा व्हिडिओ प्रसारित झाला. त्याची गंभीर दखल ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या आदेशावरून या दोन्ही रिक्षांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली आहे आणि दोन्ही रिक्षा जप्त केल्या असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. ठाणे शहरात रिक्षा चालकांनी सामान्य नागरीकांना त्रास होईल आणि शहराची तसेच रिक्षा चालकांची प्रतिमादेखील मलीन होईल असे कोणतेही कृत्य करु नये. वाहतूक नियमांची पायमल्ली करणा-या आणि उद्धट वर्तन करणा-या रिक्षाचालकांवर ठाणे परिवहन विभागाद्वारे सक्त कारवाई करण्यात येणार आहे, असा सज्जड दम ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600