देश-विदेश

उपराष्ट्रपती निवडणुकीत पूर्ण समर्थन

उपराष्ट्रपती निवडणुकीत पूर्ण समर्थन
उपराष्ट्रपती निवडणुकीत पूर्ण समर्थन फोटो: ठाणे वैभव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले नवी दिल्ली: नवी दिल्ली दौऱ्यावर असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचे एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन असेल, असा विश्वास दिला. उपमुख्यमंत्री शिंदे हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आले असता त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी त्यांना शाल-पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. मोदीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलांनी आधी 'ऑपरेशन सिन्दुर' आणि आता 'ऑपरेशन महादेव' यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांना शिवशंकराची प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच शिवसेना-भाजप युती ही एनडीए अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनची असून आता या युतीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन देईल असेही त्यांनी या भेटीत पंतप्रधानाना सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्री.शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे हेदेखील उपस्थित होते.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600