महाराष्ट्र

वडवलीत टोळक्याची तलवारीने दहशत

मासळी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला कल्याण : मद्यसेवन करून बेधुंद झालेल्या कल्याणमधील वडवली गावातील तीन जणांनी गावातील एका मासळी विक्रेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर मासळी विक्रेत्याला तीन जणांनी पकडून त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून मासळी विक्रेत्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री वडवली गावात घडला आहे. रुपेश सलफे (३०) असे गंभीर जखमी मासळी विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवी उर्फ भुऱ्या पाटील, गणेश पाटील, विकी पाटील अशी आरोपींची नावे आहेत. ते सर्व वडवली गावात तक्रारदार रुपेश सलफे यांच्या शेजारी राहतात. रुपेश यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, तिन्ही आरोपी मंगळवारी दुपारी वडवली गावात रवी पाटील याच्या ओट्यावर दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पिऊन ते बेधुंद झाले होते. रवीच्या घराशेजारी रुपेश सलफे यांचे घर आहे. रुपेश सलफे मासे विक्री करून घरी परतले होते. ते घरातून बाहेर आले. त्यावेळी रवी पाटील याने रुपेशला पाहून अर्वाच्च भाषेत घाणेरड्या शिव्या देणे सुरू केले. मी तुम्हाला काहीही केले नाही, तुम्ही मला का शिव्या देता, असे रुपेशने रवीला विचारले. त्यावेळी आरोपी विकी, गणेश यांनी रुपेशला बेदम मारहाण सुरू केली. रुपेशने घरातून धारदार शस्त्र आणून ते रुपेशच्या पोटात खुपसून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रुपेशला त्याच्या कुटुंबियांनी तिन्ही आरोपींच्या तावडीतून सोडविले. त्याला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्रथमोपचार करून रुपेशला कल्याणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुपेशला मारहाण केल्यानंतर तिन्ही आरोपी धारदार शस्त्र घेऊन रुपेशच्या घरासमोर आले आणि रुपेश वाचविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जीवे ठार मारले जाईल, असा इशारा वडवलीतील इतर ग्रामस्थांना दिला. या दहशतीने गावातील इतर रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद करून घरातून बाहेर पडणे टाळले. या तिन्ही आरोपींच्या दहशतीने वडवली गावात भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात वडवली गावात जीवघेणा हल्ल्यांचे दोन ते तीन प्रकार घडले आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600