जिल्हा

दहा रुपयांत गारेगार टीएमटी प्रवास

ठाणे: ठाणे परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसचे भाडे कमी करण्यास प्रादेशिक परिवहन विभागाने मान्यता दिल्यामुळे उद्यापासून दहा रुपयात ठाणेकरांना गारेगार प्रवास करण्यास मिळणार आहे. ठाणे परिवहन सेवेत व्होल्व्हो, सीएनजी आणि इलेक्ट्रॉनिक अशा एकूण ३० बस आहेत. या बस बोरिवली मार्गावर धावतात. परिवहन समितीने इलेक्ट्रॉनिक बसचे भाडे १० रुपये केले होते. आता सर्वच वातानुकूलित बसचे भाडे १० रुपये किमान तर कमाल ६५ रुपये इतके करण्यात आले आहे, त्यामुळे ठाणेकरांना गर्मीच्या दिवसात गारेगार प्रवास करता येणार आहे. असे असतील तिकीट दर किलोमीटर पुर्वीचे दर सुधारीत दर ०-२ २० १० २-४ २५ १२ ४-६ ३० १५ ६-८ ३५ १८ ८-१० ४० २० १०-१४ ५० २५ १४-१६ ५५ २५ १६-२० ६५ ३० २०-२२ ७५ ३५ २२-२४ ७५ ४० २४-२६ ८० ४५ २६-३० ८५ ५० ३०-३४ ९५ ५५ ३४-३६ १०० ६० ३६-३८ १०५ ६० ३८-४० १०५ ६५

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600