महाराष्ट्र
माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथे भव्य दीपोत्सव आणि महाआरती
ठाणे: अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथील श्री दत्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिवा प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भजन, वारकरी संप्रदायच्या वतीने हरिपाठ तसेच सायंकाळी ७ वाजता ११०० दिव्यांचा भव्य दीपोत्सव तसेच माजी आमदार सुभाष भोईर यांनी भगवान श्रीरामांची सपत्नीक पूजा केली. त्यावेळी श्रीरामांच्या जय घोषात संपूर्ण परिसर राममय झाला होता. यावेळी सुमित सुभाष भोईर व भोईर कुटुंबीयांसह महाआरतीला मोठ्या प्रमाणावर रामभक्त, भाविक भक्तगण उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600