जिल्हा

बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या मार्गाला हिरवा कंदील

बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या मार्गाला हिरवा कंदील
बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या मार्गाला हिरवा कंदील फोटो: ठाणे वैभव
बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बदलापूरवासियांची मेट्रोची प्रतिक्षा संपली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आणि मेट्रोला लागलेला ब्रेक निघाला असल्याचे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मतदार संघातील कामांबाबत मांडलेले मुद्दे आणि काही हरकतीची माहिती देताना आमदार कथोरे यांनी बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14 च्या मार्गाला एमएमआरडीएच्या प्रस्तावाला अर्थसंकल्पात तत्वतःमंजुरी मिळाल्याने मेट्रोच्या कामाला चालना मिळणार आहे. गुढीपाडव्याची बदलापूरवासियांना भेट मिळाली असून मुख्यमंत्री फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार कथोरे यांनी बदलापूरकरांच्या वतीने विशेष आभार मानले. बदलापूर ते कांजूरमार्ग या 38 कि मी लांबीच्या अंतरावर बदलापूर, चिखलोली, आनंदनगर एमआयडीसी, हेदूटने, शीळफाटा आदी 15 स्थानकांचा समावेश आहे, या मेट्रो प्रकल्पासाठी 14,890 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बदलापूरपासून मेट्रो सुरु व्हावी अशी नागरिकांची जुनी मागणी होती. या मागणीनुसार सुमारे 10 वर्षांपूर्वी तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रो सुरू होण्याची मागणी केल्याची आठवण आमदार कथोरे यांनी सांगितली. त्यावेळी निवडणूक आचारसंहिता लागक्याने मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडला होता. मागील महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री फडणविस बदलापुरात आले तेव्हा मेट्रो सुरू होण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. मेट्रोची मागणी पूर्ण केली जाईल असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते आणि आता मेट्रोला मंजुरी मिळाली आहे. यामुळे बदलापूर ते अंबरनाथसह परिसरातील चाकरमान्यांचा पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवास सुखकारक होणार आहे असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. मेट्रोची कारशेड बदलापुरात असल्याने बदलापूरहून मेट्रोच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. मेट्रोच्या भूसंपादन कामाला सुरुवात झाली असून मेट्रोच्या कामात कुठेही अडथळा येणार नाही, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली असल्याचे आमदार कथोरे म्हणाले. मुरबाड मतदार संघातील माळशेज घाटातील काचेचा स्कायवॉक प्रकल्प देखील मार्गी लागला असून पाच हेक्टर जागेत ह्या प्रकल्पाची निर्मिती केल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने येतील, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600