जिल्हा

परवानगीआधीच खाडी किनारा मार्गाचा ठेका

परवानगीआधीच खाडी किनारा मार्गाचा ठेका
परवानगीआधीच खाडी किनारा मार्गाचा ठेका फोटो: ठाणे वैभव
वादग्रस्त कंत्राटदार कंपनीचा ठेका रद्द करा-जितेंद्र आव्हाड ठाणे : हिमाचलमध्ये बोगदा पडला होता, शहापूरमध्ये समृद्धी महामार्गाचा निर्माणाधीन गर्डर पडला होता. ही दोन्ही कामे ज्या कंपनीला देण्यात आली होती, त्याच कंपनीला ठाणे खाडी किनारा मार्गाचे कंत्राट देण्यात आलेले आहे. पर्यावरण तसेच आवश्यक परवानग्या मिळण्याआधीच या मार्गाचे कंत्राट कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करत निवडणुक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडीग्रस्त मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख असा खाडी किनारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गाचा प्रकल्प आराखडा ठाणे महापालिकेने तयार केला आहे तर, एमएमआरडीएमार्फत या मार्गाच्या उभारणीचे काम केले जाणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून एमएमआरडीएने ठेकेदार निश्चित करून संबंधित ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला आहे. मात्र, पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्याआधीच कामाचा कार्यादेश देण्यात आल्याने प्रकल्पाचे काम वादात सापडले आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुक निधीसाठी परवानगीआधी प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप केला. बीडचे प्रकरणही निवडणूक निधीसाठीच घडले आणि आता खाडी किनारा मार्गाचे कंत्राटही निवडणुक निधीसाठी काढल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च १३०० कोटी इतका होता. त्यात वाढ होऊन तो आता २७०० कोटी इतका झाला आहे, असेही आव्हाड म्हणाले. खाडी किनारा मार्गाच्या उभारणीसाठी तिवरांच्या जंगलांची बेसुमार कत्तल होऊ शकते, तसेच सागरी किनारा नियमनाचे कठोर कायदे, नौदलाच्या जागेला खेटून मार्ग उभारला जात असल्यामुळे संरक्षण विभागाचीही परवानगी आवश्यक आहे. असे असतानाही हे कंत्राट देऊन कार्यादेश देण्याची घाई का केली जात आहे? असा प्रश्न माझ्यासह समस्त ठाणेकरांना पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घालून सदर कार्यादेश रद्द करून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवावी, अशी आमची मागणी आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि जनतेला उत्तम मार्गही मिळेल, याची खबरदारी नवे कंत्राट देताना घेतली जावी, असे आव्हाड म्हणाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600