जिल्हा
नवी मुंबईतील अर्धे करदाते मालमत्ता कर भरतच नाहीत!
नवी मुंबईतील अर्धे करदाते मालमत्ता कर भरतच नाहीत!
फोटो: ठाणे वैभव
थकबाकीदारांवर होणार कठोर कारवाई
नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात तीन लाख ५८ हजार मालमत्ता नोंदणीधारक असून यातील एक लाख ७२ हजार मालमत्ताधारक मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कर भरत नाहीत. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर ताण येत असून पायाभूत सुविधा पुरवण्यात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. या थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे असल्याची माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील गावठाण क्षेत्रात गरजेपोटी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर नवी मुंबई महानगरपालिका दुप्पट शास्ती कर आकारत आहे. त्यामुळे हा शास्ती कर रद्द करावा असा विषय भाजपाचे सभागृह नेते सागर नाईक यांनी शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी मांडला होता. यावर उत्तर देताना मनपा आयुक्तांनी सांगितले की आर्थिक नियोजनाचे गणित मांडून शहरवासीयांना पायभूत सुविधा पुरवण्यात नवी मुंबई महानगरपालिका अग्रेसर आहे. मात्र या सुविधा पुरवण्यासाठी लागणारा कररुपी आर्थिक स्तोत्र खुंटला आहे. नवी मुंबई क्षेत्रात एकूण तीन लाख ५८ हजार मालमत्ता नोंदणी धारक आहेत. यातील १० हजार तुरळक थकबाकीदार सोडले तर तब्बल एक लाख ५८ हजार मालमत्ता धारकांनी वर्षोनुवर्षे मालमता कर भरला नाही. या थकबाकीमुळे तिजोरीवर ताण येत आहे. अशा थकबाकीदारांवर कर वसुलीसाठी कठोर कारवाई येईल, अशी माहिती आयुक्त कैलास शिंदे यांनी सभागृहात दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600