जिल्हा

घोडबंदरची कोंडी सोडवण्यासाठी जड मालवाहतूक भिवंडीमार्गे

घोडबंदरची कोंडी सोडवण्यासाठी जड मालवाहतूक भिवंडीमार्गे
घोडबंदरची कोंडी सोडवण्यासाठी जड मालवाहतूक भिवंडीमार्गे फोटो: ठाणे वैभव
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सुचना ठाणे: घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत जड मालवाहतूकीला बंदी घालण्यात यावी. ही वाहतूक भिवंडीमार्गे वळविल्यास या मार्गांवरून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांना दिलासा मिळेल, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाणे महापालिकेच्या सभागृहामध्ये ठाणे शहरातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. यापैकी बहुतांश विकास कामांचे लोकार्पण १५ आक्टोबरपर्यंत करण्याचा मानस आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून उर्वरित कामे पूर्ण करावीत. ३१ डिसेंबरपर्यंत घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते जोडण्यात यावेत. रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेचे सिमेंट अस्तरीकरण करून मुख्य रस्त्याशी जोडण्यात यावेत, असे निर्देश श्री. सरनाईक यांनी दिले. या बैठकीत नागला बंदर खाडी किनारा विकसित करताना त्या जमिनीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वनराई क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातील वनराई क्षेत्र वाढविण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. ठाणे शहरात अनेक सोसायट्यांमध्ये भटक्या श्वानांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील भटक्या श्वानांचे शहराच्या बाहेर पुनर्वसन करण्यात यावे, अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ठाणे शहरातील मेट्रो स्थानकांना पुरक ठरेल अशी पर्यावरण पूरक, स्वस्त आणि शाश्वत भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून पॉड टॅक्सी (उन्नत कार) प्रकल्पाचे लवकरच भूमीपूजन करण्याचा मानस मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. त्यापुर्वी या प्रकल्पाची प्रवासी वाहतूकीच्या सुरक्षिततेची कायदेशीर मान्यता, आर्थिक व्यवहार्यता तपासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. पॉड टॅक्सी चे सादरीकरण सुमारे ५२ किमी लांबीचा मार्ग असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पात अंदाजे ६३ स्थानक असतील. तसेच पॉड टॅक्सी चा दर हा किफायतशीर असून ३० रुपये प्रति माणसी प्रति टप्पा असणार आहे. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर तिसरे नाट्यगृह घोडबंदर परिसरात बांधण्यात येईल, लवकरच याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली. दरम्यान बैठकीत मोघरपाडा येथील कांदळवन उद्यान, कासारवडवली येथील तलावाचे सुशोभीकरण, जुन्या उद्यानांचे नवीनीकरण, शहरातील विहिरींचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरुज्जीवन करणे, लता मंगेशकर संगीत विद्यालय, शहरातील चौकांचे सुशोभीकरण अशा विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी घेतला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600