जिल्हा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे आज लोकार्पण
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे आज लोकार्पण
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मीरा-भाईंदर शहरासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १८० कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन १७ नोव्हेंबर रोजी नागरिकांसाठी खुले होत आहे. हा दिवस शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचा असून, त्यांच्या स्मृतींना वाहिलेली ही एक भव्य सांस्कृतिक भेट ठरणार आहे.
दिवाळी सुट्ट्यांमध्ये १८ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत मीरा-भाईंदरमधील शालेय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित 'किड्स झोन' मध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा होलोग्राम प्रदर्शन त्यांच्या जीवनप्रवासावर आणि शिवसेनेच्या स्थापनेवर आधारित डिजिटल प्रदर्शन पहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी 'स्टडी झोन' स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शांत अभ्यासकेंद्र येथे असून ज्येष्ठ नागरिकांसाठी 'म्युझिक कॉर्नर' हा जुन्या गाण्यांचा खास संग्रह,
ॲम्फीथिएटर, संग्रहालय, ई-लायब्ररी, संगीत केंद्र, बहुउद्देशीय हॉल, कॉन्फरन्स रूम, कॅफेटेरिया, लँडस्केप गार्डन पर्यावरणपूरक सुविधा सौरऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मिनी गार्बेज रीसायकलिंग सिस्टम अशा सुविधा कलादालनात आहेत.
मीरा-भाईंदरकरांना आता मुंबईत 'काळा घोडा फेस्टिव्हल'ला जाण्याची गरज नाही. त्या सर्व कलांचा अनुभव आता आपल्या शहरातच घेता येईल. हे कलादालन म्हणजे माझ्याकडून मीरा-भाईंदरकरांना दिवाळीची खास भेट आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600