क्रीडा
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
फोटो: ठाणे वैभव
13व्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील सातवा सामना सोमवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपली मोहीम पराभवाने सुरू केली आहे. न्यूझीलंडला गतविजेते ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी हरवले, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना चार वेळच्या विजेत्या इंग्लंडशी झाला, ज्यांनी प्रोटीज संघाला केवळ 69 धावांत गुंडाळून, 10 गडी राखून विजय मिळवला.
आमने-सामने
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडने 12 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने आठ. विश्वचषकातील कामगिरीत न्यूझीलंडचं वरचस्व असून त्यांनी 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
संघ
न्यूझीलंड: सोफी डिव्हाइन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, फ्लोरा डेव्हनशायर, इझी गेज (यष्टीरक्षक), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, ब्री इलींग, पॉली इंग्लिस (यष्टीरक्षक), बेला जेम्स, अमिलिया कर, जेस कर, रोजमेरी मेयर, जॉर्जिया प्लिमर, लिया ताहूहू
दक्षिण आफ्रिका: लॉरा वुलव्हार्ट (कर्णधार), अयाबोंगा खाका, क्लोइ ट्रायॉन, नाडिन डी क्लार्क, मारीझान काप, ताझ्मिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), नॉन्कुलुलेको म्लाबा, अॅनेरी डर्क्सेन, अॅनिका बॉश, मसाबाता क्लास, सुने लिस, कराबो मेसो (यष्टीरक्षक), तुमी सेखुखुने, नॉन्डुमिसो शंगासे
कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल
सोफी डिव्हाइन: न्यूझीलंडच्या कर्णधाराने मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केली. 327 धावांचा पाठलाग करताना तिने 112 चेंडूत 112 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तिने आठ षटके मध्यमगती गोलंदाजीदेखील केली, मात्र विकेट्स पटकावू शकली नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची भूमिका महत्वाची असेल.
लिया ताहूहू: अनुभवी उजव्या हाताची माध्यमगती गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडची सर्वोत्तम गोलंदाज ठरली. तिने आठ षटकांत 42 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. 35 वर्षीय ताहूहू ही त्या सामन्यातील सर्वात किफायतशीर गोलंदाजसुद्धा ठरली.
लॉरा वुलव्हार्ट: दक्षिण आफ्रिकेची कर्णधार इंग्लंडविरुद्ध जरी केवळ पाच धावांवर बाद झाली असली तरीही तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत तिने 111 सामन्यांत 4500+ धावा झळकावून छाप पाडली आहे. तिच्या नावावर नऊ शतके आणि 35 अर्धशतके आहेत. उजव्या हाताची ही सलामीवीर फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल.
मारीझान काप: आयसीसी महिला एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली ही दक्षिण आफ्रिकेची खेळाडू इंग्लंडविरुद्ध प्रभावी कामगिरी करू शकली नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने केवळ चार धावा केल्या, आणि गोलंदाजीच्या चार षटकांत तिला एकही विकेट मिळाला नाही. 3300+ एकदिवसीय धावा आणि 150+ विकेट्स यांच्या जोरावर ती संघाची महत्त्वाची खेळाडू आहे. म्हणूनच, दक्षिण आफ्रिकेला तिच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 6 ऑक्टोबर, 2025
वेळ: दुपारी 3:00 वाजता
ठिकाण: होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी+ हॉटस्टार
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.