जिल्हा

बदलापूरमध्ये बाजारपेठेत अतिक्रमणे जमीनदोस्त

बदलापूरमध्ये बाजारपेठेत अतिक्रमणे जमीनदोस्त
बदलापूरमध्ये बाजारपेठेत अतिक्रमणे जमीनदोस्त फोटो: ठाणे वैभव
पोलीस बंदोबस्तात जेसीबीद्वारे कारवाई अंबरनाथ: बदलापूरला पूर्वेकडील बेकायदा बांधकामे नगरपालिकेच्या अतिक्रमण खात्याने भुईसपाट केल्यानंतर अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज पश्चिमेला मोर्चा वळवला. बाजारपेठेतील तसेच रस्त्याच्या बाजूला पदपथांवर असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट केली. कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पदपथ फेरीवाल्यांच्या तावडीतून मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणविरोधी पथकाने बदलापूरच्या पूर्वेकडील बेकायदा गाळे, टपऱ्यांवर सोमवारी कारवाई केली. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज बुधवारी पश्चिमेला असलेल्या बस स्थानकापासून मुख्य बाजारपेठेतून वनखात्याच्या कार्यालयापर्यँत बेकायदेशीर टपऱ्या, हातगाडीवर, दुकानाबाहेर आलेल्या अनधिकृत शेडवर कारवाई करून जोरदार दणका दिला. पूर्व आणि पश्चिमेला रस्त्यावरील वाहतूक आणि रहदारीला अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600