जिल्हा
मीरा-भाईंदरमध्ये सर्व प्रभाग समित्यांवर भाजपचेच वर्चस्व
सहापैकी तीन ठिकाणी बिनविरोध विजय
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने सर्वच ठिकाणी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे तीन प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ साठी केवळ भाजपकडूनच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे वर्षा भानुशाली, सुनीता जैन आणि मदन सिंह यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तर उर्वरित प्रभागांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली. प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे संजय थेराडे यांच्या विरोधात काँग्रेसच्या सना देशमुख, प्रभाग ५ मध्ये भाजपचे दिनेश जैन यांच्या विरोधात काँग्रेसचे अश्रफ मिस्त्री, तर प्रभाग ६ मध्ये भाजपचे प्रशांत दळवी यांच्या विरोधात काँग्रेसच्या आयरीन कॉड्रस यांनी निवडणूक लढवली.
मात्र या तिन्ही प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांच्या उमेदवारांनी सहज विजय मिळवला. त्यामुळे सहापैकी सर्वच प्रभाग समित्यांवर भाजपचे सभापती विराजमान झाले आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600