जिल्हा
नौपाड्यात ठाकरे गटाचे पायरे शिवसेनेत दाखल
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे नौपाड्यातील वजनदार नेते प्रकाश पायरे यांनी काल पाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडले आहे.
नौपाडा भागातील ठाकरे गटाच्या विभाग प्रमुख पदाची धुरा श्री.पायरे हे गेल्या अडीच वर्षांपासून सांभाळत होते, परंतु मागिल अडीच वर्षात या भागातील नागरिकांची आणि शिवसैनिकांनी मागणी केलेल्या नागरी सुविधांची कामे होत नसल्याचे सांगून श्री.पायरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. काल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, खा.नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा भगवा त्यांनी हाती घेतला. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला असून नौपाडा भागातून उबाठा जवळ-जवळ संपुष्टात आली असल्याचे बोलले जात आहे. या भागात उबाठा पक्ष जिवंत ठेवण्याचे काम श्री.पायरे हे करत होते. ते एकटे शिंदे सेनेला टक्कर देत होते, परंतु आत्ता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे नौपाडा भागात शिंदे सेनेची ताकद वाढली असून या परिसरात भाजपाविरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात यापुढे सामना होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600