जिल्हा

रात्रीच्या अंधारात होते 'लाख' मोलाची रस्ते'सफाई'

ठाणे: ठाणे शहरातून जाणारे महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांची सफाई करण्यासाठी ठाणे महापालिकेने दोन यंत्रे खरेदी केली आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने दररोज एक लाख रुपये खर्चाची सफाई केली जात आहे, मात्र ही सफाई रात्री होत असल्याने त्याच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यंत्रांच्या साहाय्याने दररोज १२० किमी रस्त्यांची सफाई केली जात आहे. यासाठी प्रत्येक कि.मी. च्या मागे ठाणे महापालिकेला ८०० रुपये संबंधित ठेकेदाराला मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाला पालिकेला एक लाख रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान रात्रीही सफाई होत असल्याने या सफाईवर प्रशासनाकडून देखरेख ठेवली जाते का? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते, शौचालये, स्वच्छता आणि सुशोभीकरण यांची कामे सुरू आहेत. याच मोहिमेत, ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी सहा सफाई यंत्रे घेण्यात येणार आहेत. शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई या यंत्रांद्वारे करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अशी यंत्रे बसवलेल्या दोन गाड्या महापालिकेकडे आल्या आहेत. एक गाडी दिवसभरात सुमारे ४० किमी रस्त्यांची सफाई करू शकते. ही यंत्रे असलेल्या आणखी चार गाड्या उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्या लवकरच ठाणेकरांच्या सेवेत दाखल होतील. या गाड्यांमुळे शहरातील मोठ्या रस्त्यांची सफाई जलदगतीने होण्यास मदत होईल. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी धूळ काढण्याचे काम या गाड्या करतात त्याचबरोबर शहरातील छोट्या गल्ल्यांमध्ये साफसफाई व्हावी, या दृष्टीने लहान इलेक्ट्रीकल गाडी आणण्याचाही विचार असल्याची माहिती त्यावेळी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली होती. रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडी असल्याने रात्रीच्या वेळी ही सफाई होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र रात्री या गाड्या दिसतच नाहीत अशा काही नागरिकांच्या तक्रारी देखील आहेत. दुसरीकडे रात्रीच्या सफाईबाबत देखरेख होते की नाही याबाबतही संशय व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600