महाराष्ट्र

जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा

कल्याण : कल्याण पूर्व शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सोमवारी सकाळी कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कळल्याने समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे. महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून काही धर्मस्थळांमध्ये प्रार्थना केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून शहरप्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून दिली जात होती. त्यामुळे समर्थकांची चिंता वाढली होती. सोमवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीचे रुग्णालयातील छायाचित्र प्रसारीत झाले आहे. यामध्ये महेश गायकवाड खासदारांशी बोलत असल्याचे दिसत आहे. हे छायाचित्र पाहून कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून एकत्र जमले असताना मुलाला मारहाण झाल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी स्वसंरक्षणाचे कारण सांगून महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी गोळीबार केला होता. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. महेश यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600