जिल्हा

गांजा विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

गांजा विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
गांजा विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश फोटो: ठाणे वैभव
* सहा लाखांचा ३० कोळी गांजा जप्त * तीन जणांना केली अटक कल्याण : कल्याण पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांनी परिमंडळ ३ कल्याण स्तरावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता विशेष पोलीस पथक स्थापन केले असून या पथकाने गांजा अंमली पदार्थ विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. डोंबिवली पोलीस स्टेशन व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण पथकाने दोन दिवसांत संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान एकुण पाच लाख ९७,७८० रुपये किंमतीचा २९ किलो ९५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. एकुण तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक मंगळवारी गस्त करीत असताना दुपारी १२:१५ वा. आयरेगांव, डोंबिवली पूर्व येथे एक इसम संशयास्पदरित्या लपण्याचा प्रयत्न करित असताना, त्यास पळुन जाताना पकडले. या इसमाच्या ताब्यातील प्लास्टीकच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये सात किलो ६६ गॅम वजनाचा एक लाख ४० हजार रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या या आरोपीचे नाव किरण शहा (४२) असे असून त्याच्याविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गोरखनाथ गाडेकर हे करित आहेत. तसेच आज विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने चोळेगांव तलाव, डोंबिवली पूर्व येथे सापळा लावुन थांबलेले असतांना, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथे मध्य प्रदेश येथील सचिन मोरे (२१) व संजु लुहार (२४) हे दोन इसम आले. त्यांना थांबवुन, त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता, या दोघांच्या बॅगेमध्ये २२ किलो, ८८९ गॅम वजनाचा चार लाख ५७,७८० रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे हे करित आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600