देश-विदेश
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर
फोटो: ठाणे वैभव
नॅशनल कॉन्फरन्स तीन, तर भाजपचा एका जागेवर विजय
जम्मू: जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल आज (२४ ऑक्टोबर) जाहीर झाले. राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने चारपैकी तीन जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पक्षाने एका जागेवर विजय मिळवला.
नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार चौधरी मोहम्मद रमजान, सज्जाद किचलू आणि शमी ओबेरॉय यांनी निवडणुकीत विजय मिळवला, तर भाजपचे सत शर्मा यांनी विजय मिळवला.
नॅशनल कॉन्फरन्सचे चौधरी मोहम्मद रमजान यांना 58, सज्जाद किचलू यांना 57 तर गुरुविंदर सिंग उर्फ शम्मी ओबेरॉय यांना 31 मते मिळाली. तर भाजपचे सत शर्मा हे 32 मते मिळवून विजयी झाले.
ही राज्यसभा निवडणूक अतिशय महत्वाची होती. कारण, कलम 370 रद्द झाल्यानंतरची पहिली राज्यसभा निवडणूक आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाल्यानंतर, राज्यसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी तीन वेगवेगळ्या अधिसूचना काढल्या होत्या. दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणुका, तर दोन जागांसाठी एकत्र निवडणूक घेण्यात आली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.