जिल्हा

महिला बचत गटांना मंजूर स्टॉल वितरणात टाळाटाळ

महिला बचत गटांना मंजूर स्टॉल वितरणात टाळाटाळ
महिला बचत गटांना मंजूर स्टॉल वितरणात टाळाटाळ फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार उपक्रमांतर्गत महिला बचत गटांना लोखंडी स्टॉल मंजूर केले होते. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ५० महिला बचत गटांना मार्च-एप्रिल महिन्यात प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष स्टॉलचे वितरण अद्याप झालेले नाही. आठ महिन्यांनंतर अचानक महापालिकेकडून सूचना देण्यात आली की, काही कारणास्तव सदर प्रक्रिया रद्द करण्यात आली असून नव्याने अर्ज करावे लागतील. या निर्णयामुळे मंजूर बचत गटांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात समाजसेवक शिवाजी रगडे यांनी महापालिका प्रशासनावर राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप केला. आम्हाला मंजूर झालेले लोखंडी स्टॉल तत्काळ वितरित करण्यात यावेत, सोमवारपर्यंत पालिका प्रशासनाने महिला बचत गटांना लोखंडी स्टॉल वितरीत करण्याचा निर्णय घेतला नाही तर मंगळवारी महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600