महाराष्ट्र

नाशिकच्या काळाराम मंदिर प्रकरणावर जितेंद्र आव्हाड संतापले

मंदिरात संविधानाची प्रत ठेवणार ठाणे: छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्या एका पोस्टनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर काळाराम मंदिर प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. शनिवारी ते काळाराम मंदिरात प्रवेश करत संविधानाची प्रत ठेवणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिलीय. संयोगिताराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पुजाऱ्यांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्यास नकार दिल्याने देखील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे वेदोक्त प्रकरण चांगलंच गाजत आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या प्रकारावर सडकून टीका केली आहे. तसेच छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने वसुधैव कुटूंबकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. संयोगिताराजे यांच्याबद्दल वाईट घडलं. या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे, त्या छत्रपती शाहू महाराजांना देखील अशीच वाईट वागणूक दिली होती. या देशाच्या घटनेवर, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी तीन वाजता यावे. आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात"

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600