जिल्हा

कडोंमपा लिपिक भूषण पाटील निलंबित

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याकडे ‘सेटलमेंट’च्या नावाखाली शरीरसुखाची मागणी केल्याच्या गंभीर आरोपाप्रकरणी प्रशासनाने कडक कारवाई करत वरिष्ठ लिपिक भूषण पाटील याला निलंबित केले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या भूषण पाटील याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने नोकरीची धमकी देत महिला कर्मचाऱ्याकडे अश्लील मागणी केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे कार्यालयात खळबळ उडाली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घेत प्राथमिक चौकशीनंतर भूषण पाटील याच्यावर निलंबनाची कारवाई केली. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने ‘सेटलमेंट’च्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलेने तक्रार दाखल केली असून, त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईनंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून, प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, तसेच अशा प्रकरणांत कठोर पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600