जिल्हा

‘नेट झिरो एनर्जी’कडे कडोंमपाची वाटचाल सुरू

‘नेट झिरो एनर्जी’कडे कडोंमपाची वाटचाल सुरू
‘नेट झिरो एनर्जी’कडे कडोंमपाची वाटचाल सुरू फोटो: ठाणे वैभव
दुसऱ्या सोलार हायमास्टचे डोंबिवलीत उद्घाटन
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘सस्टेनेबल सिटी’ या उद्दिष्टाकडे एक मोठे पाऊल टाकले असून, शनिवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात दुसऱ्या सोलार हायमास्टचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते हे उद्घाटन टाळ्यांच्या गजरात पार पडले. या उपक्रमासाठी पॅनासोनीक इंडियाकडून सीएसआर फंड प्राप्त झाला असून महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकारातून हा महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत, पॅनासोनीक इंडियाचे संदीप जयपाल, राजा मुखर्जी, सचिन ठुबे, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल म्हणाले की, “आपले उद्दिष्ट स्पष्ट असून महापालिका क्षेत्रातील प्रत्येक हायमास्ट आणि प्रमुख इमारती सौरऊर्जेवर चालल्या पाहिजेत. कल्याण- डोंबिवली शहरातील 144 हायमास्ट पूर्णपणे सोलारवर आणण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच महापालिकेच्या सर्व प्रशासकीय आणि शासकीय इमारतींवरही सोलार सिस्टम बसवण्याची तयारी वेगात आहे.” शहरातील नागरिकांनी आणि सोसायट्यांनीही पुढाकार घेऊन त्यांच्या इमारतींवर सोलार पॅनल बसवावे. यामुळे वीज बचत, खर्चात बचत, प्रदूषण नियंत्रण आणि ग्रीन एनर्जी निर्माण होऊन आपले कल्याण डोंबिवली शहर एक सस्टेनेबल शहर म्हणून पुढे येईल, असेही ते म्हणाले.
आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून चालू असलेल्या ‘सस्टेनेबिलिटी अँड सेफ्टी ऑफ सोसायटी बिल्डकॉन’ या उपक्रमांतर्गत, शहरातील सोसायट्यांशी संवाद सुरू असून शाश्वत विकासासाठी त्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या मोहिमेअंतर्गत वेस्ट मॅनेजमेंट, सोसायटी इमारतींवर सोलार पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, वेस्ट वॉटरचा पुनर्वापर, आणि ग्रीन प्लांटेशन यासाठी सोसायट्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने शाश्वत विकासाच्या दिशेने खालील उपक्रम यशस्वीरीत्या कार्यान्वित केले आहेत. त्यामध्ये महापालिका इमारतीवर 0.45 मेगावॅट सौरऊर्जा प्रणाली,नव्या इमारतींवर सोलार सिस्टम अनिवार्य, 250 पेक्षा जास्त इमारतींवर 4.5 मेगावॅट सोलार ऊर्जा कार्यान्वित,सर्व उद्यान आणि स्मशानभूमींमध्ये सोलार सिस्टम, टिटवाळा उद्यान पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे पहिले उद्यान लवकरच उपलब्ध होणार, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी  दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600