जिल्हा

शिंदे गटाशी करू गट्टी; भाजपशी होणार कुस्ती

शिंदे गटाशी करू गट्टी; भाजपशी होणार कुस्ती
शिंदे गटाशी करू गट्टी; भाजपशी होणार कुस्ती फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे उमेदवारीसाठी ४७५ अर्ज ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे तब्बल ४७५ इच्छुकांनी उमेदवारी मागितली असून पक्ष वाढविण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी जाहीर केले आहे. दरम्यान शिवसेनेने सन्मानाची वागणूक दिली तर त्यांच्याबरोबर युती होईल परंतु भाजपासोबत कदापि जाणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढणार का असा सवाल श्री. मुल्ला यांना आज विचारला असता त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे कळवले आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या प्रभागात भाजपा-सेनेची ताकद नगण्य आहे. शहरी भागात सेना आणि भाजपाची ताकद असून या प्रभागात राष्ट्रवादीला जागा सोडण्यासाठी युतीमधील दोन्ही पक्ष तयार होणार नाहीत. महायुती झाली तरी नगण्य जागा देऊन आमची बोळवण केली जाईल. त्यापेक्षा आम्ही स्वबळावर सर्व प्रभागात १३१ उमेदवार उभे करून, कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करू, अशी स्पष्ट भूमिका श्री. मुल्ला यांनी मांडली. ठामपा निवडणुकीत उमेदवारीसाठी ४७५पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या अर्जांची उद्यापासून छाननी करून अंतिम यादी प्रदेश कार्यकारणीकडे मंजुरीकरिता पाठविणार असल्याचे श्री. मुल्ला यांनी सांगितले. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सन्मानाने जागावाटप केले, तर सेनेबरोबर आम्ही युती करू परंतु भाजपाबरोबर कदापि युती शक्य नाही, असे श्री. मुल्ला यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600