जिल्हा

प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा मोठा साठा जप्त

प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा मोठा साठा जप्त
प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा मोठा साठा जप्त फोटो: ठाणे वैभव
तबेला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल उल्हासनगर : उल्हासनगरात मध्यवर्ती पोलीस आणि एफडीएच्या संयुक्त पथकाने कॅम्प-३ परिसरातील एका तबेल्यावर छापा टाकून प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील इतर तबेला चालकांमध्येही खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, संबंधित तबेला चालक दूध देणाऱ्या म्हशींकडून लवकर दूध काढण्यासाठी प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर करत होता. या तक्रारीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभाग आणि एफडीएच्या पथकाने जसलोक हायस्कूलजवळील तबेल्यावर छापा टाकून प्रतिबंधित इंजेक्शन जप्त केले. या कारवाईदरम्यान तबेला चालक प्रकाश वाधवानी (६४) यांच्या ताब्यातून प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या ६१२ प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यांची अंदाजे किंमत ११ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या इंजेक्शनचा वापर म्हशींकडून लवकर दूध काढण्यासाठी केला जात असल्याचे निष्पन्न झाले. शहरात ५० हून अधिक तबेले असून, अशाच प्रकारे काही ठिकाणी म्हशींना इंजेक्शन देऊन दूध काढले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात इतर तबेला चालकांवरही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस हवालदार सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, पोलीस शिपाई किशोर काळे तसेच एफडीएचे औषध निरीक्षक मनीष घोतमारे आणि जोसेफ चिरमेल यांच्या संयुक्त पथकाने केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600