जिल्हा

मुंब्रा बायपासवर १९ लाखांचा मद्यसाठा जप्त

ठाणे: शनिवार 26 ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने परराज्यातील भारतीय बनावटीच्या केवळ दादरा आणि नगर हवेली येथे विक्री करण्याची परवानगी असलेल्या 18.75 लाखांचा मद्यसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्तांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोघजण मुंब्रा बायपास रोडवरुन मद्यसाठा घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचत त्यांना पकडले. आरोपी घेऊन जात असलेल्या टेम्पोतून 120 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सुरज मेघवाल आणि राम डवरा या दोघांना अटक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्याने पोलिसासह प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करावी लागत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600