जिल्हा
गहाळ झालेले चार लाखांचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द
गहाळ झालेले चार लाखांचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली: विष्णुनगर पोलीस ठाणे, डोंबिवली पश्चिम येथे दाखल असलेल्या मोबाईल हरविल्याच्या तक्रारीमधील चार लाख रूपये किंमतीचे एकुण २६ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल शोधून तेमूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ७८७३ शिंदे, यांनी सी.ई.आय. आर. पोर्टलच्या माध्यमातून शोधले असून हे सर्व मोबाईल फोन मंगळवार ९ डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या हस्ते संबंधीत तक्रारदार यांना परत करण्यात आले.
कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या आदेशानुसार विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे व पोलिस शिपाई रोहिदास शिंदे व पथकाने सायबर सायबर गुन्हेतील गहाळ झालेले व चोरी झालेले मोबाईल यांचा तपास पोलीस शिपाई रोहिदास शिंदे व पथकाने केला होता.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600