जिल्हा

मानव मोरे आणि आयुष तावडे पोहणार सलग २४ तास

ठाणे: देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष, प्रजासत्ताक दिन आणि स्व.आनंद दिघे जयंतीनिमित्त सलग 24 तास पोहण्याचा विक्रम करुन अनोखी सलामी देणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता मानव मोरे आणि आयुष तावडे हे दोन जलतरणपटू सलग 24 तास जलतरण करण्याच्या विक्रमी मोहिमेची सुरूवात करणार आहेत. मानव मोरे याने राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे तर आयुष तावडे याने राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग येथे होणाऱ्या सागरी जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्या यशस्वी केल्या आहेत. येत्या 26 जानेवारीला 24 तास पोहण्याचा विक्रम हे दोघे जलतरणपटू करणार असून याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे. महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600