जिल्हा
आसनगावमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग; कंपनी जळून खाक
आसनगावमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग; कंपनी जळून खाक
फोटो: ठाणे वैभव
शहापूर: तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एसकेआय या प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले.
सोमवारी सकाळी ७ ते ८ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती उपसरपंच राहुल चंदे यांनी दिली.दरम्यान घटनास्थळी खाजगी टँकर १० तर अग्निशमन दलाच्या २ गाड्या रवाना झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून वेगाने पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्धीतील वेहळोली- आसनगाव फाट्याजवळ जवळपास ४५० कामगार असलेल्या एस. के. आय. कंपनीमध्ये ही भीषण आग लागली होती.दरम्यान आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या आगीत कोणी मृत्यूमुखी पडले नाही.परंतु आकाशात धुराचे लोळ दिसत असल्याने नागरिकांमध्ये घाबराट पसरली होती. तथापि आग लागण्याचे नेमकं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही.
यावेळी पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासह उपसरपंच राहुल चंदे, शिवसेना संपर्क प्रमुख नितीन चंदे, ज्ञानेश्वर तळपाडे, उपतालुकाप्रमुख शिवाजी चंदे, शहापूर उपनगराध्यक्ष विजय भगत,शहर प्रमुख बॉबी चंदे व एकनाथ चंदे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळत होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600