जिल्हा

तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग

तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: तुर्भे स्टोअर परिसरातील डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने धुराचे लोट आकाशात उंचावर दिसत होते. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. तुर्भे डम्पिंग ग्राउंडमध्ये संपूर्ण शहराचा कचरा एकत्रीत करून त्यावर प्रकिया केली जाते. या ठिकाणी हरित कचरा देखील गोळा केला जातो. मात्र या हरित कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असतात. शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी देखील सकाळी साडेसातच्या सुमारास येथील कचऱ्याला आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी इंदिरानगर, तुर्भे स्टोअर परिसरातील धुरामुळे डोळ्यांची जळजळ, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी समोर आल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी कुलिंगचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600