जिल्हा
दुबईत मयूर भोईरची सुवर्ण कामगिरी
उल्हासनगर: उल्हासनगर शहरालगत असलेल्या मानेरेगाव या ठिकाणी राहणाऱ्या मयुर भोईर याने दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एस.बी.के.एफ. स्पर्धेत स्विमिंगमध्ये दोन सुवर्ण पदक, एक कास्य पदक तर पाच हजार मीटर शर्यतीत एक सुवर्ण अशी चार पदके पटकावली.
मयुर भोईर हा एसएसटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून त्याचे वडील रिक्षा चालवुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. संतोष हा धावणे आणि पोहणे या क्रीडा प्रकारात तरबेज होता. मयूरने ठाणे जिल्ह्यासह दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकुन पदके मिळवली असून त्याने ३ ऑगस्ट रोजी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एस. बी. के. एफ. या स्पर्धेत पोहण्यामध्ये दोन सुवर्ण पदके तर एक कास्य पदक मिळवले आहे. तसेच पाच हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकारात एक सुवर्ण पदक मिळवले आहे.
विशेष म्हणजे कोणीही आर्थिक मदत केली नसल्याने दुबईला जाण्यासाठी मयुरच्या वडीलांनी कर्ज काढुन त्याला दुबईला पाठवले असल्याची माहीती मयुरने दिली आहे. दरम्यान या मयुरच्या नेत्रदिपक यशामुळे मानेरेगावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मयुरच्या या यशस्वी कामगिरीमुळे ठाणे जिल्ह्यासह राज्याची मान उंचावली असून या पुढे मयुरला ऑलम्पिकमध्ये भाग घेऊन देशाचे नेतृत्व करायचे असल्याची माहीती मयुरने पत्रकार परिषदेत दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600