महाराष्ट्र

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २१ जानेवारी २४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे. ब्लॉक मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणा-या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या स्थानकांनुसार थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत, छशिमट मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणा-या डाऊन हार्बर सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छशिमट मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छशिमट मुंबई ते कुर्ला आणि पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600