जिल्हा

कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार

कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार
कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार फोटो: ठाणे वैभव
दोन महिन्यांत कामाला सुरुवात होणार-रवी पाटील कल्याण : कल्याणातील मेट्रो आता खडकपाडामार्गेच धावणार असून पुढील दोन महिन्यांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाली असून प्रकल्पासाठी वाढीव निधीही मंजूर करण्यात आला आहे. महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या 60 दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असून शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या निर्णयासाठी शहरप्रमुख रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेला केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना उपनेत्या व नगरसेविका विजया पोटे, नगरसेवक गणेश जाधव, रोहन कोट, बंदेश जाधव, किरण भांगले, अनघा देवळेकर, प्रतिक पेणकर, रुपेश सकपाळ, माजी नगरसेवक मयुर पाटील, विजय काटकर, श्रेयस समेळ, अरविंद पोटे, युवासेनेचे सुजीत रोकडे, सुचेत डामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. धामणकर नाका भिवंडी ते कल्याण दुर्गाडी मेट्रो ५ व मेट्रो ५ अ म्हणजे दुर्गाडी चौक आधारवाडी-खडकपाडा-भोईरवाडी-उल्हासनगर या मेट्रोच्या सुधारित कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून एका महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार शहरप्रमुख रवि पाटील यांनी मानले. यावेळी रवि पाटील यांनी सांगितले की सन 2015 मध्ये भारतानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाचे भूमिपुजन झाले होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबले होते, परंतु आता नव्याने पुन्हा काम सुरू होणार आहे, भिवंडी-कल्याण व कल्याण ते उल्हासनगर पुढे बदलापूर-चिखलोलीपर्यंत मेट्रो धावणार आहे. पुर्वी मेट्रोचा मार्ग वेगळा होता, त्यामुळे कल्याण पश्चिम भागातील काही नागरीकांना मेट्रोचा काहीच उपयोग नव्हता, म्हणून मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी सन 2016 पासून शिवसेना शहरप्रमुख रवि पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली येथे बैठक घेतली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मेट्रो मार्ग बदलण्याचे मान्य केले. नवीन मेट्रो मार्ग आधारवाडी, खडकपाडा बिर्ला परिसरातील व कल्याण पश्चिम भागातील पाच लाख नागरिकांना फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600