जिल्हा
मेट्रोच्या कामामुळे मोठी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया
मेट्रोच्या कामामुळे मोठी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : आज दुपारी कल्याण-शीळ रोडवरील काटई नाक्याजवळ एमआयडीसीची पाण्याची मोठी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.
मेट्रो कामामुळे जलवाहिनी फुटण्याची मागील दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या मेट्रोमुळे कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. या मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण व्हायला कमीतकमी पाच वर्षे लागणार असल्याचे बोलले जात आहे. तोपर्यंत या मेट्रोचा फटका जनतेला बसणार आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. जलवाहिनी फुटल्याने डोंबिवली एमआयडीसी आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600