जिल्हा

मीरा-भाईंदर महापालिकेचे पहिले कॅशलेस रूग्णालय

सर्व शस्त्रक्रिया, उपचार, औषधे मोफत भाईंदर: मीरा-भाईंदरमधील पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांना विनामूल्य आरोग्य सेवा मिरा रोड येथील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालयात मिळणार आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी त्याचे लोकार्पण हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मीरा-भाईंदर शहरातील गरजू रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य व्हाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच नांवे १०० रूग्णशय्येचे कॅशलेस रुग्णालय सुरू होत आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व उपचार, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, व्हॉल्व्ह बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेतून मोफत होणार आहेत. महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या इमारतीचे काम ९० टक्के झाले असून १५ जानेवारीपर्यंत सर्व काम पूर्ण होईल. रुग्णालयाची इमारत कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेला बांधून मिळाली आहे. रुग्णालयाला लागणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी २५ कोटी विशेष निधी मंजूर करून आणला. यात महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. रुग्णालयाचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चालवण्यात येणार असल्याचे श्री.काटकर यांनी सांगितले. इस्पितळात रक्त तपासणी, हेमॅटोलॉजी, बायोकेमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, 2डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, केयूव्ही, सीटी स्कॅन स्क्रीनिंग, हाडांची शस्त्रक्रिया, सांधे बदलणे, कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, अँजिओप्लास्टी, हृदय शस्त्रक्रिया, व्हॉल्व्ह बदलणे, पेसमेकर बसविणे या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) असणार आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600