जिल्हा
आमदार मंदा म्हात्रे यांना हृदय विकाराचा झटका
नवी मुंबई: नवी मुंबई बेलापूर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबतची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना धीर दिला.
आमदार मंदा म्हात्रे यांना मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने बेलापूर येथील आपला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. ही बातमी नवी मुंबईत वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आल्या. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आमदार म्हात्रे यांची प्रकृती आता स्थिर आहे. याबाबतची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना व्हिडिओ कॉल करून संवाद साधत त्यांना धीर दिला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600