जिल्हा

उमेदवारी न मिळाल्याने आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात?

कुटुंबाने केला दावा पालघर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी होणारे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न दिल्याने ते टोकाचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघरमध्ये विद्यमान आमदार असलेले श्रीनिवास वनगा यांचे तिकिट कापून माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर श्रीनिवास वनगा यांना धक्का बसला आहे. ते आत्महत्या करण्याचा विचार करतायेत असा दावा श्रीनिवास वनगा यांची पत्नी आणि आईने केला आहे. याबाबत श्रीनिवास यांच्या पत्नी सुमन वनगा म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होते, कुठल्याही आमदाराला घरी बसवणार नाही. प्रत्येकाला निवडून आणू. परंतु तो शब्द पाळला नाही. कालपासून श्रीनिवास वनगा यांनी जेवण सोडले आहे. कुणाशीही बोलत नाहीत. आत्महत्या करणार असेच बोलतायेत. उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव होते, मी चुकीचं वागलो. एकनाथ शिंदेंवर मी विश्वास ठेवला, पण त्यांचा घात झाला. माझ्या नवऱ्याचं काय चुकलं असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर माझ्या पोराने अन्नपाणी सोडलं, त्याच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर आम्ही काय करायचं..? असं श्रीनिवास वगना यांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600