जिल्हा

आमदारांनी फक्त बाळकूम नव्हे सबंध मतदार संघातील नालेसफाई पहावी

देवराम भोईर यांचा पलटवार ठाणे: सबंध ठाणे शहराची घाण बाळकूममध्येच आहे, अशा पद्धतीने ठाण्यातील आमदारांनी फोटोसेशन केले आहे. आमदारांनी बाळकूममध्येच लक्ष न देता सबंध शहरातील नालेसफाई पहावी, असा टोला ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी लगावला. देवराम भोईर आणि संजय भोईर यांनी आज बाळकूम, गौतमनगर, यशस्वी नगर, ढोकाळी, हायलँड आदी परिसरातील नालेसफाईची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देवराम भोईर म्हणाले की, नाला हा वरवर साफ करून चालणार नाही. आणखी तीन ते चार फूट खोल जाऊन नाला साफ केला पाहिजे. मागील वर्षी नालेसफाई करताना पाच फूट खोलवर गेलो होतो. त्यामुळे गौतम नगरला पुराची झळ बसली नव्हती. पण यावेळेस जे ठेकेदार नेमले आहेत. त्यांच्याकडून योग्य काम झालेले नाही. मनोरमा नगरला बसणारा पुराचा फटका बसू नये, यासाठी ठामपा आणि एमएमआरडीएचे मेनहोल जर पूर्ण साफ केले नाहीत तर सबंध मनोरमा नगर आणि यशस्वी नगरला पुराचा फटका बसणार आहे. हे टाळण्यासाठी वर्षातून दोनवेळा नालेसफाई झालीच पाहिजे. आम्ही गेले पस्तीस वर्ष नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवून आहोत. दरम्यान, संजय भोईर यांनी सांगितले की, ठेकेदारांकडून नालेसफाई करताना फक्त चार इंच खोलीवरील गाळ काढण्यात येत असतो. नियमितपणे पाच फूट गाळ काढला तरच ते फायदेशीर ठरणार आहे. नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन त्यांचा संसार उघड्यावर पडत असतो. या संकटातून मुक्तता मिळावी, यासाठी वर्षातून दोनवेळा नालेसफाई करावी, अशी मागणी भोईर यांनी केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600