जिल्हा

तोंडाला मास्क लाऊन मनसे उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

तोंडाला मास्क लाऊन मनसे उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
तोंडाला मास्क लाऊन मनसे उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबईतील हवेच्या प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. याचा प्रतिकात्मक निषेध करत तोंडाला मास्क लावून मनसे राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित देसाई प्रभाग क्र. २२ ड, भूमिका म्हात्रे प्रभाग क्र. २४ क यांनी मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगारचे संप्रीत तुर्मेकर, विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी, अनिकेत पाटील, राज पाटील, प्रवीण शिंदे, शशिकांत गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गद्दार आणि पक्ष बदलूना पाडा आणि कट्टर निष्ठावंतांना निवडून आणा, असे आवाहन ही याप्रसंगी गजानन काळे यांनी केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600