जिल्हा

भिवंडीत वाहन चालकांची पेट्रोलसाठी गर्दी

भिवंडी: इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत पेट्रोल-डीझेलच्या किमती वाढणार असल्याच्या व पेट्रोल टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवांचे पीक अधून-मधून पसरत आहे. त्यामुळे आज सकाळपासून शहरातील पेट्रोलपंपांवर दुचाकी व चारचाकी चालकांनी पेट्रोलपंपावर गर्दी केली होती. शहरात पवित्र रमजानचे वातावरण आहे. या पूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीने शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच उद्या शिवजयंती असून त्या निमित्ताने उद्या शुक्रवारी मिरवणूक निघणार आहे. अशा उत्सवाच्या वातावरणात शहरात विविध अफवांचे पीक पसरत असल्याने शहरातील वातावरण बिघडत आहे. पेट्रोल पुरवठ्याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात एकूण सात पेट्रोलपंप असून या सर्व पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे पेट्रोलची उपलब्धी आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अपेक्षित पेट्रोल घेणे. शहरात पेट्रोलची टंचाई नाही, अशी माहिती पेट्रोल पंपाचे मालक मनप्रीत सिंग यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600