जिल्हा
राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समितीतर्फे शहापुरात आंदोलन
राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समितीतर्फे शहापुरात आंदोलन
फोटो: ठाणे वैभव
किन्हवली: राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियांत्रिकी अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे शासन सेवेत समायोजन करा, या मागणीसाठी १९ ऑगस्टपासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. शहापूर तालुक्यात सुद्धा आंदोलन सुरू आहे.
दहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे १००टक्के समायोजन करा. सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समावेश करणे, आंदोलनात झालेल्या पोलीस केसेस रद्द करणे, कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन करणे, अपघात विमा, सानुग्रह अनुदान मिळणे, बदली धोरण लागू करणे या मागण्यांसाठी राज्यांसह शहापूर तालुक्यात या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
शहापूर तालुक्यात १९ ऑगस्टपासून या कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी ३ सप्टेंबर रोजी शहापूर तालुक्यातील शिवतीर्थ येथे या कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहापूर तालुक्यात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जनसेवेवर याचे परिणाम दिसून येत आहेत. तालुक्यात या संपामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शासनाने मागण्या मान्य करण्याची गरज असल्याचे तालुक्यातून बोलले जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600